Mukesh Ambani News:  भारतीय व्यवसाय (business) आणि उद्योग जगतामध्ये अतिशय मानानं घेतल्या जाणाऱ्या नावांपैकी एक नाव म्हणजे धीरुभाई अंबानी यांचं. (Stock Market) शेअर मार्केटमध्ये ज्यांच्या नावाची आदरयुक्त भीती होती अशा (Dhirubhai Ambani) धीरुभाई अंबानी यांच्या मुलांनी त्यांचा वारसा पुढे नेला. मुकेश अंबानीसुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत. आतापर्यंत त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक कंपन्यांना संकटातून बाहेर काढलं आहे. यातच आणखी एका कंपनीची भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार अंबानी पुन्हा एकदा एका कंपनीचं नशीब पालटण्याच्या प्रयत्नांत आहेत. ही टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनी असल्याची बाब समोर आली आहे. NCLT कडून नुकतंच रिलायन्स (Reliance) आणि असेट्स केअर फंड रिकंस्ट्रक्शन एंटरप्राइजच्या संयुक्त बोलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. ज्यामुळं आता या कंपनीच्या गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. 


शेअर बाजारात एकच चर्चा... 


सिंटेक्स इंडस्ट्रीजकडून शेअर बाजारात दिलेल्या माहितीनुसार एनसीएलटीकडून एका खंडपीठानं दिलेल्या आदेशानंतर ही माहिती समोर आली. गेल्या दोन आठवड्यांपासून सिंटेक्सचे 52 शेअर लो लेवलवरच ट्रेंड करत आहेत. त्यांच्यासाठी मुकेश अंबानी तारणहार ठरणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : Gautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला


सूत्रांच्या माहितीनुसार रिलायन्स आणि एसीआरआयनं संयुक्त रुपात जवळपास 3650  रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. तर, सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या कर्जदात्यांनी संयुक्त व्यवहाराच्याच बाजूनं मतदान केलं होतं. या कंपनीवर असणाऱ्या कर्जाविषयी सांगावं तर, एप्रिल 2022 पासून दिवाळखोरीची चर्चा सुरु झाली. सध्या या कंपनीवर 7500 कोटी रुपयांचं कर्ज असून, या कंपनीसाठी बोली लावणाऱ्यांमध्ये ईजीगो टेक्सटाइल्स, जीएचसीएल आणि हिमत्सिंग्का वेंचर्स सहभागी होते. 


Sintex Industries Ltd या कंपनीचा शेअर 2.30 रुपयांच्याही लो लेवलवर ट्रेंड करत होते. या शेअरची रेकॉर्ड लेवल 11.45 रुपये इतकी आहे. पण, गेल्या 6 महिन्यांपासून मात्र या शेअर्समध्ये 69.13 टक्के घट पाहायला मिळाली होती.