Reliance Jio Prepaid Plan: रिलायन्स जिओ ही देशातील एक लोकप्रिय अशी टेलिकॉम कंपनी आहे. ज्याचे देशात सुमारे 49 कोटी युझर्स आहेत. देशभरात जिओने इंटरनेट सेवांच्या क्षेत्रात क्रांती केली आहे. लॉन्च झाल्यापासून अनेकांनी इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे तर जिओने देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा पोहोचली आहे. काही काळापूर्वीच जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केला होता. कंपनी आपल्या युझर्सला विविध किंमती श्रेणींमध्ये अनेक रिचार्जच्या स्कीम ऑफर करतात, ज्यामध्ये वेगवेगळे फायदे देखील होतात. युझर्स त्यांच्या गरजेनुसार स्वतःसाठी योग्य प्लान निवडू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Jio चे 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅन देखील आहेतॉ. ज्यामध्ये युझर्सना हाय स्पीड इंटरनेट कॉलिंग इत्यादीचे फायदे मिळतात. महत्त्वाचं म्हणजे जिओने ग्राहकांचं महागड्या रिचार्जचे टेन्शन दूर केले आहे. जिओच्या एका प्लॅनबद्दल समजून घेऊया जो युझर्सला कमी किमतीत हाय स्पीड इंटरनेटचा लाभ देतो.  जिओ प्लानबद्दल बोलत आहोत त्याची किंमत 186 रुपये आहे आणि हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.


प्लानचे फायदे 


प्लानच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये युझर्सना दररोज 1 GB हायस्पीड डेटा मिळतो. म्हणजेच यूजर्सना एकूण 28 GB डेटा मिळतो. हा प्लान अमर्यादित कॉलिंगसह येतो. म्हणजेच 28 दिवस कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉल करता येतील. तसेच, या प्लॅनमध्ये युझर्स दररोज 100 एसएमएस पाठवू शकतात. याशिवाय यूजर्सना या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ही योजना JioPhone युझर्ससाठी आहे. 


186 रुपयाचा रिचार्ज 


JioPhone च्या 186 रुपयांच्या प्लॅनपासून सुरुवात करून, त्याची वैधता 28 दिवसांची आहे आणि प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा उपलब्ध आहे. अशा प्रकारे तुम्ही एकूण 28GB डेटा वापरू शकता. दैनंदिन डेटा संपल्यानंतर, वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.


186 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो आणि तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. याशिवाय प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100SMS मिळतात. तसेच तुम्ही Jio Movie, Jio Security आणि Jio Cloud ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवू शकता.