Ravalgaon Candy Brand: छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय. हो. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता चॉकलेट विकण्याच्या व्यवसायातदेखील उतरणार आहे. हा ग्रुप आता पान पसंद आणि कॉफी ब्रेक चॉकलेट विकणार आहे. रिलायन्सने आपल्या साम्राज्याचा विस्तार करत आणखी एक कंपनीची डील क्रॅक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका नव्या करारानुसार रिलायन्स रिटेलची एफएमसीजी कंपनी रिलायन्स कंज्युमर प्रोडक्टने रावळगाव शुगर फार्मच्या कन्फेशनरी व्यवसायाचे अधिग्रहण केले आहे. या कराराअंतर्गत रावळगाव शुगर फार्मचा ट्रेडमार्क, रेसिपीज आणि इंटलॅक्च्युयल प्रॉपर्टीचे अधिकार रिलायन्सकडे आले आहेत. ही 27 कोटी रुपयांची डील आहे. 


सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये रिलॉंच 


याआधी गेल्यावर्षी रिलायन्सने एफएमसीजी व्यवसाय वाढण्यासाठी कॅम्पा कोलाच्या ब्रांडचे अधिग्रहण केले होते. यानंतर याचे 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे सॉफ्ट ड्रींक मार्केटमध्ये रिलॉन्च केले होते. आरसीपीएल टेकओव्हर आणि पार्टनरशिपच्या माध्यमातून रिलायन्स आपली मार्केट वॅल्यू मजबूत करत आहे. 


82 वर्षे जुना ब्रॅण्ड 


एका नव्या करारानुसार रावळगाव ब्रॅण्डमुळे रिलायन्स कंज्युमरच्या एफएमसीजी पोर्टफोलियोमध्ये वाढ होणार आहे.यामध्ये कॅम्पा, टॉफीमन आणि रस्किक सारख्या ब्रांडचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त प्रोडक्ट मिळू शकणार आहेत. 82 वर्षे जुन्या रावळगाव ब्राण्डकडे पान पसंद आणि कॉफी ब्रेक सारखे 9 कन्फेशनरी लेबल आहेत. एफएमसीजी कंपन्यांच्या स्पर्धेत आपली पकड मजबूत करण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. हे पाहता रिलायन्सकडून प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवण्यावर लक्ष दिले जात आहे. 


नीता अंबानींनी असं कमी केलं 18 किलो वजन! फिटनेस सिक्रेट आलं समोर


रिलायन्स कंज्युमर वतीने या डीलसंदर्भात कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री प्लेयर्समधील वाढती स्पर्धा आणि घटलेली बाजाराच्या हिस्सेदारी दरम्यान रावळगावने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. 


रिलायन्स रिटेल ही वेगाने वाढणारी कंजुमर गुड्स आर्म आहे. याआधी आरसीपीएलने गुजरातमधील कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक आणि ज्यूस बनवणारी सोस्यो हजूरी बेवरेजेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50 टक्के भागीदारी घेतली आहे. 


गडगंज श्रीमंत असलेले मुकेश आणि नीता अंबानी यांचे आवडते खाद्यपदार्थ? अतिशय साधेपणाचा हा एक अनुभव