मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीं जे फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 14 व्या क्रमांकावर आहे. यांची अंदाजे एकूण संपत्ती $88.4 अब्ज म्हणजेच अंदाजे 7,32,221 कोटी रुपये आहे. अंबानी कुटुंबाबद्दल कायमच प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. एवढे गडगंज श्रीमंत असलेल्या व्यक्ती काय खातात? त्यांच्या आहारात भारतीय पदार्थांचा समावेश असतो का? त्यांच घरातील वागणं, घरी जेवणं बनवलं जातं का? या ना अशा अनेक प्रश्नांबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. पण अतिशय श्रीमंत असलेले मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपलं आयुष्य अतिशय साधेपणाने जगतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या पदार्थात भारतीय पदार्थांचा समावेश असतो. जाणून घेऊया ते कोणते पदार्थ?
प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी भेळ मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची सगळ्यात आवडीच्या पदार्थांपैकी एक आहे. अंबानी यांना स्वाती स्नॅक्समधून दही बटाटा पुरी आणि भेळसारखे स्ट्रीट फूड खायला आवडते. मुंबईत असलेले हे साधे फास्ट-फूड जॉइंट 1960 च्या दशकापासून बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींसाठी आवडीचे स्नॅक्स बनले आहे. गुजरातमधील ट्रेडिशनल खाद्य पदार्थांपैकी भेल हा पदार्थ आहे. अंबानींना या रेस्टॉरंटची भेळपुरी खूप आवडते असे म्हणतात.
अब्जाधीश अंबानी हे शाकाहारी जेवण खाणे पसंत करतात. कायमच त्यांना पारंपरिक पदार्थ खायला आवडतात. एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी रात्रीच्या जेवणात गुजराती पद्धतीचे पदार्थ खायला आवडतात. पौष्टिक पदार्थांसोबतच अतिशय पारंपरिक पदार्थांचा समावेश आहारात असतो. गुजराथी डाळ मुंबई आणि दिल्लीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
राजमा चपाती कुणाला आवडत नाही? अंबानी कुटुंबाला देखील राजमा-रोटी खायला आवडते. घरी असलेल्या प्रोफेशनल शेफने तयार केलेली राजमा रोटी चवीने खातात. ज्यामध्ये पौष्टिक कॅलरीजचा समावेश असतो.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही दही बटाटा खूप आवडते. जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा ते आवडीने हे स्ट्रीट फूड खातात. भेळ सोबतच दही बटाट्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणं आहेत.
मुकेश अंबानींना दक्षिण भारतीय पदार्थ आवडतात. खास करुन इडली सांबार खाण्याची त्यांची आवड कायम राहिली आहे. कॅफे म्हैसूर हे प्रसिद्ध दक्षिण भारतीय रेस्टॉरंट आहे जे मुंबईतील माटुंगा किंग्जसर्कल येथे आहे. विशेष म्हणजे, हे रेस्टॉरंट इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) जवळ आहे, जिथे मुकेश अंबानी यांनी एकेकाळी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये BE पदवी मिळवली होती. दर रविवारी, भारतीय अब्जाधीश इडली सांबारचा घरगुती नाश्ता करतात, जो त्यांना मनापासून आवडतो.