मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे ७० अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. प्रसिद्ध उद्योजक वॉरेन बफेट यांना मागे टाकत मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानावर आपले नाव कोरले. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या या आकडेवारीला फोर्ब्स इंडियाने दुजोरा दिला . दरम्यान कोरोना काळात देशाची आर्थिक घडी विस्कटली असली तरी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जीओच्या व्यवसायात वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २० दिवसांमध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५.४अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. २० जूनला मुकेश अंबानी फोर्ब्सच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ९व्या स्थानी होते. तेव्हा त्यांची एकूण संपत्ती ६४.५ अब्ज डॉलर इतकी होती. फक्त २० दिवसांमध्ये त्यांच्या संपत्तीत ५ डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 



फोर्ब्स रिअल टाइम बिलिनेयर रँकिंच्या क्रमवारीत अब्जाधीशांच्या संपत्तीचं आकलन मालमत्ता शेअरच्या किंमतीच्या आधारे निश्चित केलं जातं. आज रिलायन्सचे शेअर्स १८७८.५० रुपयांवर बंद झाले. मुकेश अंबानी आशियाचे टायकून बनले आहेत. 


सांगायचं झालं तर, वॉरेन बफेट यांनी कोरोना काळात २.९ अब्ज डॉलरचं दान केलं आहे. त्यामुळे त्यांच्या  संपत्तीत घट झाल्याचे दिसून येत आहे. वॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती ६७.९ अब्ज डॉलर आहे.