मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी यांच्या नावाची नोंद आहे. उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांत अंबानी यांच्या उद्योगसमुहानं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हजारोंच्या संख्येनं नागरिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करुन दिल्. आहेत. वर्षानुवर्षांपासून सुरू असणारं हे सत्र सातत्यानं अंबानींच्या संपत्तीच मोठी भर टाकत गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणामी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचा आकडा पाहता त्यांच्या या उद्योगाचा आणि या संपूर्ण संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असणार हा प्रश्न आजवर अनेकांच्या मनात घर करुन गेला.


पुढे जाऊन काय असेल अंबानींच्या संपत्तीचं गणित?


वडील धीरुभाई अंबानी यांच्या उद्योगाला मुकेश अंबानी यांनी आज ज्या स्तरावर आणलं आहे हे अतिशय प्रशंसनीय आहे. त्यातच आता एका कार्यक्रमादरम्यान खुद्द मुकेश अंबानी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या या जबाबदारीचा मोठा भार कोणावर असेल याचं चित्र स्पष्ट झालं आहे.


वडिलांशी केली मुलांची तुलना


रिलायन्स डे दरम्यान, मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश अंबानी, अनंत अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी या तिघांचंही तोंड भरुन कौतुक केलं. हे तिघंही पुढच्या पिढीचं नेतृत्त्व करत आहेत, यात मला कोणतीच अडचण नाही,उलट ही गर्वाची बाब आहे.


तिघंही रिलायन्स उद्योग समूहाला वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी सक्षम आहेत. ‘मी दर दिवशी रिलायन्स उद्योग समुहाप्रती या तिघांची मेहनत पाहतोय. त्यांची समर्पकता आणि कर्तव्यनिष्ठताही दिसतेय.


देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्यासाठी आणि अनेकांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठीचं वेड मी स्पष्ट पाहिलं आहे’, असं ते म्हणाले.


अंबानी यांच्याकडून मुलांबद्दल करण्यात आलेलं हे वक्तव्य पाहता आता त्यांनी या कामातून काहीशी उसंत घेत. पुढच्या पिढीवर जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत. थोडक्यात कोट्यवधींच्या संपत्तीसाठी अंबानींनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची निवड केली आहे असं म्हणायला हरकत नाही.