तुम्हीही धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुकेश अंबानींची कंपनी जबरदस्त ऑफर्स देत आहे. ऑफर अंतर्गत तुम्ही फक्त 10 रुपयांना सोने खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्हाला तुमचे सोने घरी बसून खरेदी करता येणार आहे. 


स्मार्टगोल्डसह धनत्रयोदशी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीपूर्वी, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर, मुकेश अंबानींच्या कंपनी जिओ फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेडने त्यांची नवीन योजना “स्मार्टगोल्ड” लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करू शकता जेणेकरून तुमचे सोनेही सुरक्षित राहील. स्मार्टगोल्ड योजनेंतर्गत, ग्राहक कधीही सोन्यामधील त्यांची गुंतवणूक रोख, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांमध्ये रूपांतरित करू शकतात.


या योजनेची खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला हजारो किंवा लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त 10 रुपयांमध्ये सोने खरेदी करू शकता.


अशी करा गुंतवणूक 


मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्स ॲपद्वारे तुम्ही स्मार्टगोल्ड योजनेत दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता. ग्राहक एकूण गुंतवणुकीची रक्कम ठरवू शकतात किंवा सोन्याच्या वजनानुसार सोने खरेदी करू शकतात. भौतिक सोन्याची डिलिव्हरी फक्त 0.5 ग्रॅम किंवा त्याहून अधिक होल्डिंग्सपुरती मर्यादित असेल आणि 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या मूल्यांमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही थेट सोन्याची नाणी खरेदी करण्याची सुविधा देखील घेऊ शकता, यासाठी तुम्हाला होम डिलिव्हरी देखील मिळेल.


चोरीची भाती नाही 


स्मार्टगोल्ड योजनेअंतर्गत ग्राहक 24 कॅरेट सोने देखील खरेदी करू शकतात. ते सुरक्षित विमा केलेल्या तिजोरीत ठेवले जाईल. यामुळे सोने तर सुरक्षित राहीलच पण चोरीची भीतीही राहणार नाही. ॲपच्या मदतीने तुम्हाला हव्या तेव्हा सोन्याची थेट किंमत पाहता येईल.


जिओफायनान्स ऍपद्वारे असं करा सोनं खरेदी 


सर्वात अगोदर जिओ फायनान्स ऍप डाऊनलोड करा. 
यानंतर तुम्ही त्यावर स्मार्टगोल्डची सुविधा मिळवण्यासाठी अकाऊंट ओपन करा. 
डिजिटल सोनं खरेदी करण्यासाठी प्रोसेस सुरु करता येईल. 
यानंतर आपल्या गुंतवणुकीवर नजर ठेवा. डिजिटल सोनं होल्डिंग्ससाठी त्यावर लक्ष ठेवा. यामध्ये मूल्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळे. यानंतर जेव्हा ऍप तयार होईल तेव्हा डिजिटल सोन्याची गुंतवणूक तुम्ही व्यावहारिक सोन्यात कन्वर्ट करु शकता.