अंबानींच्या ड्रायव्हरला किती पगार ? कशी होते निवड ?
मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
मुंबई : महागाईने उच्चांक गाठला असून प्रत्येकाला इथे श्रीमंत बनायचे आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी हे फोर्ब्स मॅग्झीनच्या यादीत जगभरातील यादीत 13 व्या स्थानी आहेत. पण त्यांच्या ड्रायव्हरचा पगार किती आहे ? त्याची निवड कशी होते ? याबद्दल तुम्हाला माहित आहे का ? मुकेश अंबानी यांच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण इथंपर्यंत पोहोचणे ही वाटते तितके सोपे नाही.
अशी होते निवड
सर्वात श्रीमंत आशियाईच्या ड्रायव्हरची निवड प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची असते. अंबानी ड्रायव्हरची निवड करण्याचे काम खासगी कंपनीला देतात. निवड केलेल्या ड्रायव्हरवर कोणता गुन्हा दाखल आहे का ? याची पडताळणी केली जाते. निवड झाल्यानंतर ही कंपनी ड्रायव्हरला ट्रेनिंग देते. त्यानंतर ड्रायव्हरला अनेक कठीण परीक्षांमधून जावे लागते. या सर्व प्रक्रियेनंतर ड्रायव्हरची नियुक्ती केली जाते.
ड्रायव्हरचा पगार
इतक्या कठीण प्रक्रियेनंतर ड्रायव्हरची नियुक्ती केली जाते म्हटल्यावर पगार देखील तसाच असणार हे नक्की. अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार हजारांमध्ये नसतो तर लाखांमध्ये असतो. मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरला 2 लाख पगार मिळत असल्याचे वृत्त आहे. याचा अर्थ त्याला एका वर्षात 24 लाख रुपये मिळतात. एका वृत्तानुसार अंबानींनी मुलगी ईशाच्या लग्नासाठी साधारण 720 कोटी रुपये खर्च केले होते. एवढेच नव्हे तर त्यांचे घर एंटीलीया हे जगातील सर्वात महाग घरांमधील एक आहे. त्यामुळे ड्रायव्हरला 2 लाख रुपये देणे अंबानींसाठी काही मोठी गोष्ट नाही.
टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये धमाका केल्यानंतर मुकेश अंबानी रियल इस्टेट सेक्टरमध्ये प्रवेश करत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुंबईच्या जवळ एक जागतिक मेगासिटी बनवण्याची ब्लू प्रिंट बनवत आहेत. रिलायन्स हा प्रकल्प उभारणार तर आहेच सोबत त्या शहराचे प्रशासन पूर्णपणे रिलायन्सच्या ताब्यात असणार आहे. हे शहर अस्तित्वात आल्यानंतर मुंबईचा चेहरा पूर्णपणे बदलून जाईल असेही म्हटले जात आहे.
देशातील सर्वात जास्त ग्राहक संख्या असलेल्या अमेझॉनला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एक रणनीती आखली आहे. मुकेश यांनी केल्या दोन वर्षांमध्ये छोट्या छोट्या अशा साधारण 26 कंपन्यांमध्ये भागीदारी घेऊन रणनीतीवर अंमल करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी दोन वर्षात 17.41 हजार कोटींची गुंतवणूक देखील केली आहे.