नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.  मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi Resigns) यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले होते. सुत्रांच्या माहिताीनुसार,  देशाच्या विकासात तुमचं योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्वींना म्हणाले. (mukhtar abbas naqvi resigns as union minister of minority affairs)


नक्की राजीनामा का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्तार अब्बास नक्वी हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असलेलं राज्यसभेचे सदस्य आहेत. नक्वी यांचा राज्यसभा खासदार म्हणून उद्याचा (7 जुलै) शेवटचा दिवस आहे. खासदारपदाचा कार्यकाळ संपत आल्याने नक्वींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. भाजपने नक्वी यांना यावेळेस राज्यसभेवर पाठवलं नाही. त्यामुळे भाजपकडून नख्वी यांना मोठी जबाबदारी मिळू शकते, अशीही चर्चा रंगू लागली आहे.


मोदी कॅबिनेटमध्ये 8 वर्षांपासून 


नक्वी यांनी 2010-16 या कालावधीत राज्यसभेत यूपीचं सदस्यत्व करत होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांना झारखंडमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.


मतदारांनी नक्वींना पहिल्यांदा  1998 मध्ये लोकसभेवर पाठवलं. तेव्हा नक्वी यांना वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. 


त्यानंतर नक्वी 26 मे 2014 ला मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक कार्य आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री बनले. नजमा हेपतुल्ला यांनी 12 जुलै 2016 ला  राजीनामा दिला. त्यानंतर नक्वी यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या स्वतंत्र प्रभाराचा कारभार सोपवण्यात आला. त्यानंतर नक्वी यांना 30 मे 2019 ला मोदी कॅबिनेटमध्ये अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.