मुंबई : उत्तर प्रदेशची माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना पुन्हा एकदा लखनऊच्या मेंदाता रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोटात दुखू लागल्या कारणाने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सपा संरक्षक मुलायम सिंह यादव यांना शनिवारीच डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलं होतं. मात्र पुन्हा एकदा रविवारी संध्याकाळी त्यांची तब्बेत बिघडली यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात नेण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटात सूज आल्यामुळे दुखत होतं यावर उपचार घेण्यासाठी बुधवारी संध्याकाळी शहीद पथवर असलेल्या मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन दिवसाच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मात्र आजार पुन्हा बळावला आहे. 



शनिवारी हॉस्पिटलमधील डॉ. राकेश कपूर यांनी सांगितलं की, माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं पोट फुगत होतं. अनेक दिवसांपासून त्यांच पोट साफ झालं नव्हतं. त्यांच्या पोटातील मोठ्या आतड्यांमध्ये काही समस्या आहेत. 


कोलोनोस्कोपी करून त्यांच पोट साफ करण्यात आलं. रूग्णालयाच्या गेस्ट्रोइंट्रोलॉजिस्टिक डॉ. अभय कुमार वर्मा आणि गॅस्ट्रो सर्जन डॉ. आनंद प्रकाश यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या उपचारानंतर त्यांना सोडण्यात आलं. मात्र पुन्हा तब्बेत बिघडय्वारर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.