`चीनकडून हल्ल्याची तयारी पूर्ण... देशाचा खरा शत्रू पाकिस्तान नाही तर चीन`
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत भारत - चीन तणावाचा मुद्दा उचलून धरला. यावेळी, त्यांनी चीनवर रोष व्यक्त केला.
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार मुलायम सिंह यादव यांनी बुधवारी लोकसभेत भारत - चीन तणावाचा मुद्दा उचलून धरला. यावेळी, त्यांनी चीनवर रोष व्यक्त केला.
संसदेच्या मान्सून अधिवेशनात बोलताना त्यांनी, 'भारताचा खरा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान नाही तर चीन आहे.... चीननं भारतावर हल्ला करण्याची सगळी तयारी पूर्ण केलीय' असं वक्तव्या केलंय.
हा प्रश्नावर वारंवार चर्चा केल्यानंतरही केंद्र सरकारकडे चीनविरुद्ध भारत काय पाऊल उचलणार आहे? या प्रश्नाचं उत्तर नाही. मुलायम बोलत असताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अनेकदा त्यांचं बोलणं लवकर संपवावं, अशी विनंती केली. परंतु, मुलायम यांना मात्र भलताच चेव चढला होता.
चीन हिंदूस्तानला कधीच माफ करणार नाही, असं वक्तव्य करतनाच माजी सरकारवर आगपाखड करत, भारतानं तिबेट कोणत्याही किंमतीत चीनकडे सोपवायला नको होतं... तिबेट चीनच्या ताब्यात देऊन भारतानं मोठी चूक केलीय.
भारत-चीन सीमेवर चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता भूटान आणि सिक्कीमच्या सुरक्षेची जबाबदारी भारतावर आहे, असंही त्यांनी म्हटलंय. चीनकडून भारतीय बाजारपेठेत पाठवल्या जाणाऱ्या निष्कृष्ठ दर्जाचं वस्तूंवरही त्यांनी टीका केलीय.