Multibagger Stock | फक्त 15 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 3000 रुपयांवर; गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा
शेअर बाजारात नेहमीच चढ उतार सुरू असते. शेअर्सच्या चढ उतारात अनेक शेअर गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. असे शेअर तुम्हाला भविष्यात तुम्हाला दमदार परतावा देऊ शकतात. अशाच शेअरबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. (Stock market)
Share Market: शेअर बाजारात नेहमीच चढ उतार सुरू असते. शेअर्सच्या चढ उतारात अनेक शेअर गुंतवणूकीसाठी उत्तम पातळीवर आहेत. असे शेअर तुम्हाला भविष्यात तुम्हाला दमदार परतावा देऊ शकतात. अशाच शेअरबाबत आम्ही तुम्हाला आज माहिती देणार आहोत. (Stock market)
शेअर बाजारातील अनेक शेअरने गुंतवणूकदारांना (invester) दमदार परतावा (Return) दिला आहे. अशा शेअरची निव़ड करणे अवघड असते. त्यासाठी गुंतवणूक करण्याआधी संबधीत शेअरचा अभ्यास आणि गुंतवणूक तज्ज्ञांचा (Stock market Expert)सल्ला महत्वाचा ठरतो. अशाच एका मल्टीबॅगर (Multibagger Share) शेअरबाबत आपण माहिती घेणार आहोत. गेल्या 10 वर्षात या शेअरने दमदार परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 2 हजाराच्या आसपास ट्रेड करीत आहे.
दीपक नायट्रेड (Deepak Nitrite Share Price) च्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळाला आहे. एकेकाळी हा शेअर फक्त 15 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. तर या वर्षी या शेअरने थेट 3000 रुपयांच्या पुढे मजल मारली आहे.
10 वर्षात तुफान परतावा
10 फेब्रुवारी 2012 मध्ये Deepak Nitrite चा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 15 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. 2021 मध्ये या शेअरने 3000 चा आकडा पार करीत होता.
शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3020 रुपये आहे. तर 52 आठवड्यांचा निच्चांक 1681 रुपये आहे. Deepak Nitrite चा शेअर सध्या 2 हजार रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.
एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षापूर्वी या शेअरमध्ये 15 हजार रुपये गुंतवले असते तर, आज त्या गुंतवणूकीची वॅल्यू 30 लाखांच्या आसपास असती.