Multibagger Stock:शेअर बाजारातील घसरणीच्या काळातही अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. असाच एक मल्टीबॅगर शेअर म्हणजे विकास लाइफकेअर होय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीकडून 12 कोटी 50 लाख इक्विटी शेअर्सऐवजी 50 कोटींचा फंड उभारण्याचे लक्ष्य होते. कंपनीच्या संचालक मंडळाने फोर्ब्स EMF ला 54,00,000 शेअर्स, Nomura Singapore Limited ला 4,40,00,000 शेअर्स आणि AG Dynamic Funds Limited ला 2,70,00,000 शेअर्स विकण्यास मंजुरी दिली आहे, म्हणजेच आता मोठे समूहही यात गुंतवणूक करत आहेत. कंपनीने याबाबत एक्सचेंजला माहिती दिली आहे.


कंपनीच्या शेअरचा जबरदस्त परतावा
विकास लाइफ केअरने वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. अवघ्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 4.60 रुपये प्रति शेअरवरून 5.40 रुपये प्रति शेअर झाली. म्हणजेच कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्समध्ये 6 महिन्यांत 60% ची तेजी दिसून आली आहे, तर एका वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 2.66 रुपयांवरून 5.40 रुपयांपर्यंत वाढली आहे.