Share Market : 'शेअर मार्केट इज सबजेक्ट टू मार्केट रिस्क' ही ओळ प्रत्येक म्युच्युअल फंड, एसआयपी गुंतवणुकीच्या जाहिरातींमध्ये ऐकायला मिळते. बरं या ओळीचे एकंदर वेग पाहता, खरंच इतका धोका असतो का? असे भाबडे प्रश्नही अनेकांनाच पडतात. किंबहुना याच भीतीपोटी अनेकजण शेअर बाजारात गुंतवणूकही करत नाहीत. पण, अनेकदा जी मंडळी गुंतवणूक करतात त्यांचं नशीब एका क्षणात पालटतं आणि संयमाचं फळ त्यांना चांगल्या परताव्याच्या स्वरुपात मिळतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या असाच दणदणीत परतावा एका शेअरनं त्याच्या गुंतवणुकदारांना मिळवून दिला असून, त्याचा दर अविश्वसनीयरित्या वाढतच चालला आहे. अवघ्या चार वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअरमध्ये प्रामुख्यानं मागील महिन्यापासून वाढ होण्यास सुरुवात झाली. ही कंपनी आहे, स्टर्लिंग अँड विल्सन रिन्‍यूएबल एनर्जी लिमिटेड (Sterling and Wilson Renewable Energy Ltd). गुरुवारी, म्हणजेच 25 जानेवारी 2024 ला या कंपनीचा शेअर 577 रुपये म्हणजेच अप्पर सर्किटमध्ये होता. 


हेसुद्धा वाचा : Manoj Jarange Mumbai Morcha LIVE: आज मुंबईत धडकणार मराठ्यांचं वादळ; पाहा कुठे पोहोचले लाखो मराठा आंदोलक 


महिन्याभरातील परताव्याचा आढावा घ्यायचा झाल्यास या शेअरनं (Renewable Energy Stocks) एनर्जी सेक्टरमध्ये 31 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागच्या 52 आठवड्यांमध्ये हा या शेअरचा उच्चांक होता. 19 ऑक्टोबरला हाच शेअर सर्वाधिक कमी किमतीवर म्हणजेच 253 रुपयांवर पोहोचला होता. सध्याच्या घडीला तब्बल 1.35 अब्ज रुपयांची मार्केट कॅप असणाऱ्या या कंपनीच्या शेअरमध्ये मागच्या पाच दिवसांपासून 28 टक्क्यांची समाधानकारक वाढ झाली आहे. सहा महिन्यांच्या अंदाजानं या शेअरनं 58.72 टक्के इतका घसघशीत परतावा दिला आहे. 


परदेशी गुंतवणुकदारांनी वाढवली गुंतवणूक 


डिसेंबरच्या तिमाहीदरम्यान या शेअरमध्ये आणि कंपनीमध्ये परदेशी गुंतवणुकदारांनी रस दाखवत गुंतवणूक सातत्यानं वाढवली होती. आकड्यांमध्ये हे प्रमाण मागच्या तिमाहीच्या तुलनेत 8 टक्के इतकं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्समध्ये खुद्द मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जीचाही समावेश असून, इथं त्यांची भागिदारी 32.56 टक्के इतकी आहे. 


शेअर आणखी किती उंची गाठणार? 


कधीकाळी 77 रुपयांवर असणारा आणि आताच्या घडीला सातपट परतावा देणारा हा शेअर येत्या काळात आणखी उंची गाठणार असून, त्याची किंमत साधारण 620 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तेव्हा आता शेअर बाजाराचा आलेख या शेअरला कितपत साथ देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.