Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली पण इथून पुढं तसं होऊ देणार नाही अशा निर्धाराच्या शब्दांसह मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा आता मुंबईत दाखल होत आहे. मजल दरमजल करत लाखोंच्या संख्येनं एवटलेले हे मराठा आंदोलक मुंबई गाठत इथं आरक्षणाची मागणी उचलून धरणार आहेत.
26 Jan 2024, 16:03 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आझाद मैदानावरचा निर्णय उद्या
आज रात्रीपर्यंत अध्यादेश दिला तर गुलाल उधळायला मुंबईत जाणार, पण नाही दिला तर उपोषणासाठी आझाद मैदानात जाणार. आझाद मैदानाचा निर्णय उद्या घ्यायचा आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. मनोज जरांगे आरक्षणावर ठाम
26 Jan 2024, 15:58 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: सरकारला निर्वाणीचा इशारा
माझा मराठा समाजा इथे न्यायासाठी आला आहे. आमच्या मराठा समाजाला वाईट वागणूक दिली तर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना घरात न राहात मुंबईत धडक द्या. आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करु नका. अध्यादेश दिला तर आझाद मैदानात जाणार नाही. पण नाही दिला तर आझाद मैदानात धडक देणार असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे सरकारकडे रात्रीपर्यंतचा वेळ दिला.
26 Jan 2024, 15:52 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: तर आजची रात्र इथेच काढतो
एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहाणार नाही, मराठावाडा हा सगळा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता आजच्या रात्रीत सगेसोयरे अध्यादेश द्यावा, कायद्याचं सन्मान करुन आम्ही आझादा मैदानात जात नाही आजची रात्र इथेच काढतो आम्हाला मुंबईत यायची हौस नाही. पण आज संध्याकाळपर्यंत अध्यादेश द्या.
26 Jan 2024, 15:48 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती नको
मराठा बांधवांवर टाकण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे तस लेखी पत्र दिले नाही ते पत्र त्यांनी द्यावे, मराठा समाजाला 100 टक्के मोफत आरक्षण मिळावं, मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करू नका नोकरीत भरती करायची असेल तर मराठ्यांसाठी जागा रिक्त सोडा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
26 Jan 2024, 15:44 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: तात्काळ प्रमाणपत्र घ्या नंतर तपासणी करा
शिंदे समिती रद्द करणार नाही, त्याची मुदत दोन महिने वाढवली आहे. टप्प्यटप्प्याने वर्षभर मुदत वाढवली जाणार आहे. ज्याची नोंद नाही मिळाली त्याच्या गणगोताच्या नोंदीवर प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी होती. यावर ज्याचे संगेसोयरे यांना जर प्रमाणपत्र मिळावे तर त्याचा शपथपत्र घ्यावे आणि तात्काळ प्रमाणपत्र द्या नंतर त्याची तपासणी करा असं जरांगेंनी सांगितलं आहे.
26 Jan 2024, 15:40 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: ... तर नोकरभरती नको
आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती करायची नाही, जर भरत्या करायच्या असल्या तर मराठ्यांच्या जागा राखीव ठेवून करायच्या अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. यावर सरकारची बाजूही त्यांनी आंदोलकांपुढे मांडली.
राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय शासनानं निर्गमित केला. यावर मुलांना ही सूट न दिल्यामुळं जरांगेनी नाराजीचा सूर आळवला. सरकारनं निर्णय घेतले पण, या साऱ्याचा शासन निर्णय येणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
26 Jan 2024, 15:34 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: गुन्हे मागे घ्या... ; जरांगेंची मागणी
अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली असता सरकारनं मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याचा दावा केला. पण, अद्याप आपल्याला आदेशपत्राची प्रत मिळाली नसल्यामुळं आधी ते पत्र द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली.
26 Jan 2024, 15:32 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: सगेसोयरे...
ज्या मराठ्यांकडे नोंद नाहीये त्या मराठ्यांना नोंदी असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी तो आपला नातलग असल्याचं शपथपत्र देणं अपेक्षित असेल. त्याच शपथपत्राच्या आधारावर त्या बांधवांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी 'सगेसोयरे' हा मुद्दा स्पष्ट करत म्हटलं. इथंही सरकारनं सगेसोयऱ्यांची चौकशी करावी आणि शंका आढळल्यास प्रमाणपत्र नाकारवं असंही ते ठामपणे म्हणाले.
26 Jan 2024, 15:29 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: प्रमाणपत्राचं गणित
'इथं एका नोंदीवर पाच फायदे झाले तरी दोन कोटी मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो. पण, वंशावळ जोडण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता समिती गठीत करण्यात आली आहे', अशी वस्तुस्थिती त्यांनी यावेळी मांडली.
26 Jan 2024, 15:27 वाजता
Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: चर्चा झाली पण....
चर्चा झाली खरी, पण मंत्रीमहोदय मात्र आले नाहीत. सरकारनं त्यांची भूमिका मांडली, आम्ही आपली भूमिका मांडली, असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधिक करण्यास सुरुवात केली. जिथं त्यांनी मराठा नोंदी आरक्षणात सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप करा. 54 लाख नोंदी आहेत, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती करायची असेल तर त्या पंचायतींना तुम्ही नावांची यादी द्या, अशा मागण्या सरकारच्या शिष्टमंडळासमोर मांडल्याचं स्पष्ट केलं.
54 लाख नोंदींपैकी सध्या 37 लाख नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र दिल्याचा दावा सरकारच्या वतीनं देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळतील असं ग्राह्य धरु असं म्हणताना मराठ्यांनी मात्र सावध होत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्जही करणं अपेक्षित असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.