मुंबई : पश्चिम रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेसला ‘हाय-लक्झरीयस’ असे ‘अनुभूती’ कोचेस जोडण्यात येणार आहेत. अत्यंत आधुनिक आरामदायी असे अनुभूती कोचेस चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शताब्दीतला क्लास एक्झुकेटीव्ह चेअरकार कोचेसना अनुभूतीचे हे अत्याधुनिक कोचेस जोडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानातून प्रवास केल्यासारखा आरामदायी अनुभव मिळणार आहे.अनुभूती कोचमध्ये ५६ आसने आहेत. 


आरामदायी खुर्ची, पाय ठेवण्यासाठी अधिक मोकळी जागा, प्रत्येक आसनाच्या मागे ९ इंच एलसीडी स्क्रीन, वैयक्तिक मोबाईल चार्जिंग अशी सुविधा देण्यात आली आहे. कोचच्या मध्यभागी छताला दोन स्क्रीन असून यात जीपीएस तंत्रज्ञानाने ‘रिअल टाईम’ नुसार गंतव्य स्थान, आगामी स्थानकाला लागणारा वेळ, प्रवासाचे अंतर हे सर्व बसल्या जागी दिसणार आहे.



या कोचमध्ये प्रथमच सेंसर युक्त शौचालये बसविण्यात आली आहेत. या अनुभूती कोचना अ‍ॅन्टी-ग्राफिटी रंग देण्यात आला आहे. अशा पद्धतीने रंगवण्यात येणारा ‘अनुभूती’ हा पहिलाच कोच आहे.