राँची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे अडचणीत आले आहेत. हेमंत सोरेन यांच्या राजकीय कारकीर्दीतील ही सर्वात मोठी अडचण असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईच्या एका महिलेने हेमंत सोरेनवर बलात्काराचे कथित आरोप केले आहेत. या आरोपानंतर भाजपाने सोरेन यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढंच नाही बलात्काराच्या आरोपाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील भाजपाने केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाने यावर म्हटलं आहे की, ही चौकशी यासाठी महत्त्वाची आहे कारण, देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की, एका राज्याचा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्रीपदावर असताना एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, तेव्हा सत्य जे काही असेल ते देशासमोर येणे गरजेचं आहे.


तर दुसरीकडे झारखंड मुक्ति मोर्चा म्हणजेच जेएमएमने म्हटलं आहे की, भाजप डर्टी पॉलिटिक्स करतंय.


झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आणि सुरेश नागरे या इसमाविरोधात २०१३ साली कोर्टात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. यानंतर या महिलेने लग्न आणि केस लढू शकत नसल्याचं कारण देत ही केस मागे घेतली होती.


मात्र आता याच महिलेने ८ डिसेंबर २०२० ला वांद्रे पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देत हेमंत सोरेन विरोधात गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.