`माझ्या नशिबी जे आलं ते कोणाच्याही येऊ नये`; 26/11 हल्ल्यातून बचावलेला Baby Moshe आता `असा` दिसतो
(Mumbai) मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ).
26/11 Mumbai Attack : मुंबई तू कधी थांबत नाहीस... असं या शहराला भेट देणारे अनेकजण म्हणतात. पण, हीच मुंबई 2008 मध्ये थांबलेली, सुन्न झालेली. कारण होतं. या शहरावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला (26/11 terror Attack ). 26 नोव्हेंबरला अजमल कसाब आणि त्याच्यासोबत शहरात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी कहर केला आणि अनेकांना त्यांच्या या हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यातून एक चिमुकला बचावला होता. त्याचं नाव बेबी मोशे (Baby moshe) म्हणजेच मोशे होल्ट्जबर्ग.
26/11 Mumbai Attack ला 14 वर्षे पूर्ण होतानाच आपल्यावर जो प्रसंग ओढावला, तो कोणावरही ओढावू नये असं मोशे म्हणत आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी एकत्र येऊन त्यांनी दहशतवादाशी लढा द्यावा अशी आर्जवही तो करत आहे. कारण, मुंबई दहशतवादी (Mumbai terror attack) हल्ल्यामध्ये त्यानं स्वत:चे आई-वडील गमावले होते. हल्ल्यावेळी मोशे 2 वर्षांचा होता. नॅनी (Andta samuel) अँड्रा सॅम्युअलमुळं त्याचा जीव वाचला होता. सध्या मोशे 16 वर्षांचा आहे. इस्रायसमध्ये (Israel) असणाऱ्या औफला मधील एका शाळेत तो शिकवतो. तिथेच आजी-आजोबांसोबत तो राहतो.
नॅनीमुळं वाचला मोशे...
हल्ल्यादरम्यान मोशे आणि त्याची भारतीय नॅनी सँड्रा मुंबईतील नरिमन हाऊस/ छाबाड हाऊस येथे अडकले होते. या हल्ल्यातील अनेक फोटो समोर आले, त्यावेळी नोशेला उराशी बिलगून धरलेल्या अँड्राच्या फोटोनंही जगाचं लक्ष वेधलं होतं. या भ्याड हल्ल्यामध्ये मोशेचे वडील रब्बी गॅब्रिएल होल्ट्जबर्ग आणि आई रिवका होल्ट्जबर्ग यांचा मृत्यू ओढावला होता.
वाचा : Shradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा
गुरुवारी हिब्रू दिनदर्शिकेनुसार जेरुसलेम येथे असणाऱ्या कब्रस्तानात मोशे आणि त्याच्या कुटुंबानं प्रियदजनांसाठी प्रार्थना केली. हल्लीच मोशेनं एका ध्वनीमुद्रित संदेशाच्या माध्यमातून वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नॅनी सँड्राच्या साहसाला दाद दिली. तिच्यामुळेच मी आज जगतोय असंही तो म्हणाला.
आपल्या नशिबी जे आलंय ते कोणासोबतही होऊ नये असं म्हणताना मोशेनं जागतिक स्तरावर असणाऱ्या संघटनांना दहशतवादाशी लढा देण्यासाठी हाक दिली. तर, मोशेचे काका मोशे हॉल्जबर्ग यांनी चांगुलपणा आणि दया हेच दहशतवादाच्या अंधकाराचं उत्तर आहे असं वक्तव्य केलं.