Shradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा

Shradha Walkar Case :दगडाचं काळीज असणाऱ्या आफताबनं श्रद्धाचा जीव घेतला आणि नात्यांनाच काळीमा फासला. जिनं जिवापाड प्रेम केलं, तिच्यासोबतच तो असा का वागला?   

Updated: Nov 26, 2022, 08:43 AM IST
Shradha Walkar Case :... आणि 'त्या' क्षणी आफताबनं श्रद्धाला संपवण्याचं ठरवलं; Polygraph test मधून अखेर उलगडा  title=
Shraddha Walkar case questions asked to Aaftab Poonawala was asked during polygraph test latest Marathi news

Shradha Walkar Case : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर (Shradha walkar murder case) प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आली आहे. अतिशय क्रूर मानसिकतेनं श्रद्दाचा जीव घेत तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला याची नुकतीच (what is Polygraph test) पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. शुक्रवारी तब्बल 8 तासांसाठी Forensic Science Laboratory (FSL) in New Delhi यांच्यातर्फे ही चाचणी करण्यात आली. यादरम्यान आफताबवर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. श्रद्धाशी असणारं नातं आणि आपल्याशी असणारं नातं इथपासून कोणच्या क्षणी इतक्या हैवानी कृत्यासाठी प्रवृत्त झालास? इथपर्यंतचे प्रश्न त्याला विचारण्यात आले. 

पॉलिग्राफ चाचणीत आफताबला (Aaftab Poonawala ) नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले? 

FSL शी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबला त्या एका क्षणाबाबतही प्रश्न करण्यात आला, जेव्हा श्रद्धाला जीवे मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. श्रद्धाची हत्या करण्याचा कट पूर्वनियोजित होता, की हत्येच्याच वेळी मनात असणाऱ्या क्रूर भावनेतून हे कृत्य केलं? असे प्रश्न त्याला विचारण्यात आला. तपास यंत्रणांना या चाचणीतून बरीच माहिती मिळाल्याचं कळत आहे.

घटनाक्रमाविषयीसुद्धा उलगडा (shradha walkar case timeline)

श्रद्धा वालकर प्रकरणामध्ये आफताबला घटनाक्रमही विचारण्यात आला. श्रद्धाशी ओळख झाल्यापासून रिलेशनशिपमध्ये येईपर्यंत आणि त्यानंतरच्या दिवसांपर्यंतचे सर्व संबंधित प्रश्न त्याला विचारण्यात आले. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारं आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यालाठी केलेल्या कृत्यासंबंधीच्या प्रश्नांचा भडीमार त्याच्यावर करण्यात आला. या चाचणीदरम्यान त्याला साधारण 40 प्रश्न विचारण्यात आले. 

हेसुद्धा वाचा : Shraddha Walker : 'त्या' एका गोष्टीमुळे मुंबई पोलिसांची चौकशी?; अमित शाह यांचे संकेत

डेटिंगच्या दिवसापासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दिवसापर्यंत सर्व माहिती आफताबकडून काढण्यासाठी यावेळी यंत्रणेनं सापळा रचला होता. दरम्यान, पोलिसांना आफताबच्या भाड्याच्या घरातून 5 सुरे सापडले आहेत. पण, श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानं वापरलेलं हत्यार मात्र अजूनही सापडू शरलेलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला घरातून सापडलेले सुरे पुढील तपासणीसाठी FSL कडे पाठवण्यात आले आहेत.