नवी दिल्ली : Mundka fire case : राजधानी दिल्लीत मुंडका येथे आगची मोठी दुर्घटना घडली. या आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सात जण आत अडकल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम दिल्ली परिसरातील काल एका इमारतीला संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीप्रकरणी कारखाना मालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीची चौकशीची करण्यात येणार आहे. दिल्लीतील मुंडका येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएलची टीम घटनास्थळी जाणार आहे. एफएसएल टीम आगीचे कारण शोधून काढेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांची बैठक रद्द केली. एमसीडीच्या बुलडोझर कारवाईवर बोलावलेली आमदारांची बैठक रद्द केली आहे. सकाळी 11 वाजता बोलावलेली बैठक रद्द करण्यात आली. आदेश गुप्ता यांच्या घरावरील आजचे आंदोलनही आम आदमी पक्षाने रद्द केले. मुंडका आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इमारतीत अग्निसुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती, अशी माहिती पुढे आली आहे. दिल्ली अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती. या इमारतीला अग्निशमन विभागाने एनओसीही दिलेली नाही. ही आग इतकी भीषण होती की यात अख्खी बिल्डिंगच आगीच्या विळख्यात सापडली आहे. आठ तासांहून अधिक वेळ ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. दरम्यान इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



सकाळी मुंडक्याच्या इमारतीत सर्व काही सुरळीत सुरु होते. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोटिव्हेशनल क्लास सुरु होता. 4.30 वाजता इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन धूर निघू लागला. त्यानंतर पहिल्या मजल्यावर आरडाओरडा सुरु होता. आग लागल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि 10 मिनिटांनी पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. 4.50 वाजता इमारतीतून बाहेर पडण्यासाठी लोकांनी दोरीच्या साहाय्याने पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अनेकांची सुटका केली. 



सायंकाळी 5.00 च्या सुमारास एकामागून एक अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. सायंकाळी 6.20 वाजता एका 45 वर्षाच्या महिलेचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला. आग विझवण्याचे काम सुरूच होते. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री 10.50 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली आणि कुलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली. अग्निशमन दलाने एकूण 16 मृतदेह बाहेर काढल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आली. ही संख्या हळूहळू वाढू लागली आणि 27 वर पोहोचली. पुन्हा एकदा 11.40 च्या सुमारास पहिल्या मजल्यावर ज्वाला दिसू लागल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. रात्री 12.00 वाजेपर्यंत कूलिंग कामासह शोध मोहीम सुरुच होती.