माणुसकीला काळीमा फासणारी घटना! एकाच बेडवर झोपल्या होत्या दोन तरूणी, त्यानंतर....
एकाच बेडवर झोपल्या होत्या दोन तरूणी, नराधम लांडग्यांनी एकीच्या प्रायव्हेट पार्टला.... अंगावर काटा आणणारा
Crime News : पश्चिम बंगालमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना प्रकार समोर आली आहे. तिन नराधम आरोपींनी मिळून दोन मुलींना बेदम मारहाण केली त्यानंतर त्यातील एका आरोपीने मुलीचा प्रायव्हेट पार्टला रॉडने जाळण्याचा प्रयत्न केला. दोघींवर बलात्काराचा प्रयत्न करत होते मात्र मुलींनी आरडाओरडा केल्यावर नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला.
मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी सागरदिघी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलींवर अत्याचार करणारे दोन आरोपी आपले नातेवाईक असल्याचे त्याने सांगितले. तर तिसरा आरोपी त्यांचा शेजारी आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे, त्याचा शोध सुरूच आहे.
दोन्ही मुलींचे वय 21 ते 22 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, आम्ही दोघी गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही रोज एकमेकींना भेटतो. 25 ऑक्टोबरला माझ्या मैत्रिणीने मला फोन करून ती आजारी असल्याचे सांगितले आणि मला घरी बोलावलं तिथेच रात्र झाली होती म्हणून मी तिच्या घरी थांबले.
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास माझ्या मैत्रिणीचे दोन नातेवाईक अचानक खोलीत आले. त्याच्यासोबत एक शेजारीही होता. तिघांनी आम्हाला विचारले की आम्ही एकाच बेडवर का झोपतोय? मग आम्ही म्हणालो की आम्ही दोघी मैत्रिणी आहोत . पण ते लोक म्हणाले की आम्हाला तुमच्या नात्याबद्दल सर्व माहिती आहे. त्यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने माझ्यावर आणि माझ्या मैत्रिणीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनी विरोध केला असता त्यांनी आतून इलेक्ट्रिक रॉड आणून माझ्या मैत्रिणीचा प्रायव्हेट पार्ट जाळला यानंतर तिघेही तेथून पळून गेले. जाताना त्यांनी आम्हाला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
सध्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित मुलींचे जबाब घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.