हुबळी : गडंग जिल्ह्यातील लिंगायत मठाने एका मुस्लिम व्यक्तीकडे मुख्य पुजारीपदाचा मान दिला आहे. दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला यांना हा मान देण्यात आला आहे, एएनआयने याविषयी ट्वीट केलं आहे. वयवर्ष ३३ असलेल्या या मुस्लिम व्यक्तीकडे २६ फेब्रुवारीरोजी परंपरागत विधी केल्यानंतर मठाच्या पुजारीचा मान दिला जाणार आहे. शरीफ हे विवाहित असून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला आता मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतीधाम मठात मुख्य पुजारी असणार आहेत.  कर्नाटकातील आसुती गावात हा मठ आहे. हा मठ खजुरी गावातील 350 वर्षे पुरातन कोरानेश्वर संस्थान मठाचा आहे. शरीफच्या वडिलांनी 2 एकर जमीनदेखील काही वर्षांपूर्वी दान केली आहे.



ANI शी बोलताना दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला म्हणाले 'सर्वांनी माझ्या गळ्यात पवित्र बंधन बांधत नवी जबाबदारी दिली आहे. हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. मी धर्माच्या रस्त्यावर चालत राहणार. मला प्रेम आणि त्यागाचा संदेश दिला आहे. आता मी देखील तोच पुढे वारसाच्या स्वरूपात देईन, आणि प्रसार करेन'.