मुंबई : इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतो. इंग्रजी येत असलं तरी ते बोलण्याचा आत्मविश्वास आपल्यात मुळीच नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या इंग्रजीवर लोक हसतील, चिडवतील याची भीती आपल्या मनात असते. अशी तुमचीही परिस्थिती असेल तर सनदी अधिकारी सुरभी गौतम यांच व्हायरल होणारं भाषण नक्की ऐका. 


सामान्य मुलीची कहाणी ः


सुरभी गौतम यांचा जन्म मध्यप्रदेशमधल्या एका छोट्याशा गावात झाला. सुरूवातीपासूनच हुशार असलेल्या तिला खूप शिकून कुटुंबियांना अभिमान वाटेल, असं काहीतरी करण्याचं स्वप्न होतं. स्वप्न साकारण्यासाठी तिने मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी सगळी मुलं अस्खलित इंग्रजी बोलून आपला परिचय करून देत होती.


आपल्यालाही इंग्रजी बोलावं लागणारं या विचारानंच तिची घाबरगुंडी उडाली. कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करत तिनं शिक्षकांना आणि इतर वर्गमित्रांना आपला परिचय करून दिला.


ती वेळ निभावली असं तिला वाटत असताना शिक्षकांनी तिला एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर येत असूनही ते इंग्रजीत नेमकं कसं द्यावं, हे माहित नसल्याने ती गप्प बसून राहिली. वर्गासमोर झालेला अपमान तिच्या जिव्हारी लागला. आणि हिच मुलगी पुढे अस्खलित इंग्रजी बोलू लागली. 


प्रवास उलघडणारा व्हिडिओ :


सामान्य घरातून आलेल्या या मुलीचा आयएएस अधिकारीच्या पदापर्यंतचा प्रवास पाहण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा. तुम्ही नक्कीच प्रभावित व्हाल.