मुंबई : Mutual Fund Investment:  आजच्या काळात 100 रुपयांत काय मिळतं असा विचार आपण नेहमीच करतो. कारण ज्या वेगाने महागाई वाढत आहे, त्यामाने 100 खूपच कमी वाटतात. पण 100 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीतून तुम्ही कोट्यवधी रुपये जमवू शकता. येथे अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल बोलत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. SIP मध्ये गुंतवणूक फक्त 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते. याला 'मायक्रो एसआयपी' (Micro SIP)  म्हणतात.


गुंतवणूकीचे नियोजन


या गुंतवणुकीत लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे तुम्हाला एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही. मायक्रो-एसआयपीमध्ये दर महिन्याला फक्त 100 रुपयांची छोटी गुंतवणूकही तुम्हाला दीर्घकाळासाठी कोट्यवधींचा परतावा देऊ शकते.


जर तुम्ही दर महिन्याला 100 रुपयांची मायक्रो-एसआयपी केली तर तुम्ही वर्षभरात 1200 रुपये जमा कराल. म्हणजेच येत्या 20 वर्षात या फंडावर नजर टाकली तर तुमची ठेव 24000 रुपये होईल. दुसरीकडे, जर तुम्हाला दरवर्षी 12 टक्के परतावा मिळत असेल, तर तुमचा 98,925 रुपयांचा निधी तयार होईल. 30 वर्षांनंतर ते सुमारे 3.5 लाख रुपये होईल. 50 वर्षात पाहिल्यास ते 39 लाखांपर्यंत पोहोचेल.


या कागदपत्रांची गरज


गुंतवणक सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त नाव आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल.