मुंबई : शेअर बाजारात नुकतेच अनेक आयपीओ येऊन गेले. अजूनही काही आयपीओ बाजारात ऍन्ट्री घेणार आहेत. बाजारात नवीन लिस्टिंग झालेल्या कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी चांगले पैसे बनवले परंतु अनेकांच्या हाती काहीही आलेले नाही. अशातच म्युचुअल फंड मार्केटमध्ये अशी स्किम आहे की, ज्यामुळे तुम्ही नुकतेच लिस्ट झालेल्या शेअरच्या तेजीचा फायदा घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही स्किम म्हणजेच Edelweiss Recently Listed IPO Fund होय. या स्किमच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या त्या स्टॉकमध्ये लावला जातो. जे स्टॉक नुकतेच लिस्टिंग झाले आहेत.


Edelweiss Recently Listed IPO Fund ने गेल्या वर्षभरात साधारण 73 टक्के रिटर्न दिला आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. नवीन लिस्ट होणाऱ्या शेअर्समधून दमदार रिटर्न्स मिळाले आहेत.


तसेच या  फंडचा 3 वर्षाचा रिटर्न 24 टक्के राहिला आहे. 1 लाखाची वॅल्यु साधारण 2 लाख झाली आहे. तसेच 1 हजार मंथली SIP ची वॅल्यु वाढून 6.40 लाख रुपये झाली आहे..