Crime News : लग्नानंतरचे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर घटस्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशाच प्रकारे पतीने आपल्याच बायकोविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची घटना समोर आली आहे. तक्रारीमध्ये बायकोवर सासऱ्यांना म्हणजेच पतीने त्याच्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
उत्तर प्रदेशमधील अलिगड जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या पत्नीवरच वडिलांची हत्या केल्याचा आरोप केला. बायकोचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते, पत्नी आणि शेजारी माझ्या वडिलांना संशयास्पद स्थितीमध्ये सापडले होते. वडील याबाबत सर्वांना सांगतील या भीतीने माझ्या पत्नीने वडिलांना जेवणामध्ये विष देत मारलं आहे. रोरावार पोलीस स्टेशनच्या परिसरातील ही घटना आहे.  
 
शेजारच्यासोबतच्या अनैतिक संबंधांबाबत सासऱ्यांना माहिती झाल्यामुळे त्यांची हत्या केल्याचा आरोप पतीने केला आहे.  पतीने तक्रार केल्यानंतर पत्नी फरार असल्याची माहिती आहे. पत्नीच्या विरोधात तक्रार केली आहे मात्र पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप पतीने केला आहे. वडिलांच्या निधनाला 6 दिवस झाले असल्याचं तक्रार करणाऱ्या पतीने सांगितलं आहे.


दरम्यान, या संपूर्ण घटनेचा तपास आणि पुढील कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आल्या असल्याचं एसपी रजनी यांनी सांगितलं. पत्नी पळून गेल्याने तिच्यावरचा संशय आणखी दाट झाला आहे.