नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारण प्रवेश होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. दरम्यान, हा प्रवेश करावा की नाही याबाबत राजन यांनी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. हा सल्ला देताना त्यांची पत्नी म्हणाली....


राजन म्हणाले 'नो कॉमेंट्स'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारण प्रवेशाबाबत शक्यता दर्शवणाऱ्या सर्व बातम्यांचा रघुराम राजन यांनी फेटाळून लावल्या. ते म्हणाले, सध्या मी अध्यापनाचे काम करत आहे. आणि त्यात मी खूश आहे. रघुराम राजन सध्या प्रोफेसर म्हणून काम पाहतात. आम आदमी पक्षाकडून मिळणाऱ्या राज्यसभेवरील संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता राजन यांनी केवळ 'नो कॉंमेंट्स' म्हणत विषयाला बगल दिली.


माझ्या क्षेत्रात मी खूष - राजन


आपल्याला कोणाकडूनही ऑफर आली नाही. त्यामुळे आपण या विषयावर कोणतीही प्रतिक्रीया देऊ इच्छित नाही, असे सांगत जेव्हा मी आरबीआयचा गव्हर्नर होतो तेव्हा लोक मला आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) मध्ये पाठवू इच्छित होते. आता मी पुन्हा एकदा प्रोफेसर बनलो आहे. या प्रोफेशनमध्ये मी खूश आहे, असेही रघुराम राजन म्हणाले.


पत्नी म्हणाली 'नो एण्ट्री'


राजकारणात जाण्याबाबत मला माझ्या पत्नीने थेट नाही म्हटले आहे, असेही राजन यांनी प्रांजळपने सांगून टाकले आहे. दरम्यान, राजन सध्या एका पुस्तकावर काम करत असून, लवकरच त्यांचे नवे पुस्तक बाजारात येण्याची शक्याता आहे.