आंध्रप्रदेश : टीडीपी नेता आणि फिल्मस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रागाच्या भरात बालकृष्णा यांनी असा प्रकार यापूर्वीही अनेकदा केला आहे. 


नंदमुरी बालकृष्णा हे 'डोर टू डोर' अंतर्गत सरकारी योजनांचा प्रसार करण्यासाठी फिरत होते. यावेळी लोकांमध्ये जाऊन काही योजनांची माहिती देताना  गर्दी झाली. एका अरूंद रस्त्यातून बाहेर पडताना एका समर्थकाचा धक्का लागल्याने बालकृष्णांचा पारा चढला. त्यांनी थेट त्याच्या कानशिलात लगावले. तेथील इतर समर्थकांनी बालकृष्णांना रस्ता करून देत तेथून बाहेर काढले.  




बालकृष्ण हे आंध्रप्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री  एनटी रामाराव  यांचा मुलगा असून राजकीय आणि सिनेमा अशा दोन्ही क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे.