`भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल`
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार थंडावले, किंबहुना ठप्प झाले. त्यातच...
मुंबई : Coronavirus कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरातच थैमान घातलं आहे. लाखोंच्या घरात कोरोना बाधित आणि मृतांची संख्या पोहोचलेली असतानाच आता याचे थेट परिणाम हे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही. गेले कित्येक दिवस कोरोनाच्या संसर्गाचा अंदाज लक्षात घेत देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. सर्व व्यवहार थंडावले, किंबहुना ठप्प झाले.
एकिकडे हा कोरोना आरोग्यास घातक ठरत असतानात दुसरीकडे तो अर्थव्यवस्थाही कोलमडवत आहे. अर्थाच सरकारकडून त्यासाठी आवश्यक ती सर्व पाललं उचलली जात आहेत. पण, तरीसुधा पुढील काही वर्षे कोरोनामुळे बसलेल्या या फटक्याचे परिणाम दिसणार आहेत. याच धर्तीवर जर देशाच्या आर्थिक चक्राचा मंदावलेला वेग पूर्ववत आणायचा असेल तर, येत्या २-३ वर्षांमध्ये भारतीयांनी आपल्या कामाच्या ठिकाणी आठवड्याचे ६० तास काम करावं असा इशारा इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला. थोडक्यात भारतीयांनी ऑफिसमध्ये जास्तवेळ काम केले तर अर्थव्यवस्था पटकन उभारी घेईल हाच सूर त्यांनी आळवल्याचं पाहायला मिळालं.
'पुढील २-३ वर्षांसाठी आपण दिवसातून दहा तास, आठवड्यातून सहा दिवस आणि ४० तासांच्या आठवड्याच्या अगदी विरुद्ध असं ६० तास काम करु अशी प्रतिज्ञाच घेतली पाहिजे. तरच आपण, अर्थव्यवस्थेला पूर्ववत आणत तिला वेग देऊ शकू', असं मूर्ती म्हणाले. सरकारसाठीही त्यांनी काही सल्ले दिले. सरकारने काही प्रतिष्ठित आणि प्रस्थापित व्यक्तींची समिती स्थापन करुन अशा व्यक्तींकडून व्यापार- उद्योग क्षेत्रामध्ये असणाऱ्या या परिस्थितीविषयीचे सल्ले मागवावेत. अगदी तसंच जसं १९९१ मधील आर्थिक चळवळीदरम्यान करण्यात आलं होतं, हे उदाहरणही त्यांनी दिलं.
मुख्य म्हणजे आपण सांगितलेल्या या दोन गोष्टी केल्यास आ संकटातून अधिक ताकदीने बाहेर येता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाचं संकट हे फार काळ टीकणारं असल्याचे संकेत देत येत्या काळात जवळपास १२ ते १८ महिने आपण याच परिस्थितीसोबत वावरण्यास शिकलं पाहिजे असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची अशी काळजी घ्या....
कोरोनाशी लढण्यासाठी कंपन्यांची कार्यपद्धती रुळावर येऊ लागल्याच कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांचं आरोग्यंयही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या साऱ्याची काळजी कशी घेतली जावी, याबाबतही त्यांनी काही पर्याय सुचवले.
मूर्ती यांनी अनेक कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी दोन वेळाऐवजी तीन वेळा म्हणजेच तीन शिफ्टमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. तर, कारखान्यांच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी गाऊन, मास्क, ग्लोव्ज, गॉगलचा वापर केला जाण्यावर त्यांनी जोर दिला. शिवाय ज्येष्ठांनी घरुन किंवा त्यांच्या स्वत:च्या ऑफिसमधून काम करावं असा ही सल्ला त्यांनी दिला.