नवी दिल्ली : सूरतच्या सेशल कोर्टने आसारामचा मुलगा नारायण साईला दोन बहीणींवर बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आहे. न्यायालयाने साईला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता नारायण साईची नवी ओळख कैदी नंबर 1750, लाजपोर जेल, बॅरेक नंबर 6 अशी झाली आहे. त्याच्यावरील आरोप ठरल्यानंतर नियम देखील बदलले आहेत. त्याला तुरूंगातील सर्व नियम लागू होतील जे इतर कैद्यांसाठी असतात. त्याला आता तुरूंगातील जेवणच खावे लागणार आहे. त्याला जमेल असे काम देखील देण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पीडित दोन बहीणींचे जबाब या केसमध्ये महत्वपूर्ण मानले गेले आहेत. दोन्ही बहीणींनी सर्व जागा ओळखल्या. तसेच 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्ष झाल्या. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला. नारायण साई गेल्या 5 वर्षांपासून तुरूंगात आहे. न्यायालयाने पीडितेला 5 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. लाजपोर तुरूंगात 2013 पासून बंद असलेल्या साईच्या तीन सहकाऱ्यांनाही न्यायालयाने वेगवेगळ्या आरोपांखाली दोषी ठरवले आहे. या तिघांमध्ये दोन सहकारी महिला आहेत. यांना देखील 10-10 वर्षांचा तुरूंगवास झाला आहे. साईंचा ड्रायव्हर राजकुमार याला देखील सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. 



बलात्कार, लैंगिक शोषण, अनैतिक संबंध बनवणे आणि इतर आरोप प्रकरण सुरत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेतली. यामधील एक तक्रार ही आसाराम तर दुसरी तक्रार ही नारायण साई याच्याविरूद्ध होती. दोन बहीणींपैकी लहान बहिणीने नारायण साईवर आरोप केला होता. 2002 ते 2005 पर्यंत आपले सलग लैंगिक शोषण केल्याचा आरोप नारायणवर होता. यावेळी पीडित सूरत येथील आश्रमात राहत होती.