Narendra Modi Oath Taking Ceremony : 'मी नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरची शपथ घेतो की...', असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या नव्या टीममध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 मंत्री स्वतंत्र कारभार, 36 राज्यमंत्री असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात एनडीएने सरकार स्थापन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंग यांनी शपथ घेतली. तर त्यापाठोपाठ मोदींचे जवळचे सहकारी अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर नितीन गडकरी यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीये. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे देखील मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजर होते. तसेच भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 



केंद्रिय मंत्रिमंडळाच्या शपथविधीला मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे उपस्थित होते. 


दरम्यान, शपथ घेण्याआधी पंतप्रधान मोदी आज सकाळीच राजघाटावर पोहोचले आणि ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच वॉर मेमोरिलला भेट देऊन वीर जवानांना अभिवादन केलं होतं.