नवी दिल्ली : एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भाषण करण्याआधी मोदी भारताच्या संविधानासमोर नतमस्तक झाले. यानंतर मोदींनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे हे आमचे दिशादर्शक आहेत, असं मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. ही निवडणूक माझ्यासाठी तीर्थयात्रा होती. मोदींमुळे नाही तर जनतेमुळे आपलं अस्तित्व आहे. प्रसिद्धीपासून लांब राहा, असा सल्ला खासदारांनी दिला.


मंत्रिमंडळाच्या चर्चा करणाऱ्यांना टोला


माध्यमांमध्ये सुरु असलेल्या मंत्रिमंडळाच्या बातम्यांवरही मोदींनी निशाणा साधला. मंत्रिमंडळ बनवणारे अनेक मोदी आहेत. मंत्रिमंडळाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. भावी मंत्रिमंडळाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. बातम्यांमुळे मंत्रिपद मिळतही नाही आणि मंत्रिपद जातही नाही, असं मोदी म्हणाले.


व्हीआयपी संस्कृती सोडा


व्हीआयपी संस्कृतीचा जनतेच्या मनात तिरस्कार आहे, त्यामुळे यापासून लांब राहण्याचा सल्लाही मोदींनी नव्या खासदारांना दिला. विमानतळावर सुरक्षा रक्षकांकडून होणाऱ्या तपासणीवेळी खासदारांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. पण तुम्हीही सामान्य नागरिक आहात, असं मोदी म्हणाले. मंत्र्यांच्या लाल दिवा काढल्यानंतर मोदींनी लाल दिव्याची नशा उतरवली, असा संदेश गेल्याचं मोदींनी सांगितलं.