नवी दिल्ली : देशाच्या सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी १६ जानेवारीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ३५४७ कोटी रुपयांत असॉल्ट रायफल आणि कार्बाइन खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायफल खरेदीमूळे सीमेवरील सैनिकांच्या गरजेनुसार तात्काळ आधारावर पूर्तता केली जाणार आहे.


सुरक्षा मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा अधिग्रहण परिषद (डीएसपी) ने ७२००० असॉल्ट रायफल आणि ९३ हजार ८९५ कार्बाईन खरेदी प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली.


या खरेदीमूळे सशस्त्र दलाला छोटे हत्यारची पूर्तता होणार आहे.


रायफल खरेदीमध्ये 'मेक इन इंडिया' ला प्रोत्साहन


या हत्यारासाठी खरेदी प्रक्रीया सुरू करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. ही खेरदी सरकाक ते सरकाक (जी टू जी) स्तरावर केली जाऊ शकते. 


रक्षा डिझाइन आणि रक्षा उत्पादनमधील खाजगी क्षेत्रातील भागीदारी आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे.


यासाठी डिसीपी यांनी प्रक्रीयेच्या मेक टू श्रेणीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. उद्योगासाठी अनुकूल  आणि सरकारचे कमीत नियंत्रण असावे अशी सरळ प्रक्रीया असणार आहे.