पंतप्रधान मोदी कर्ज बुडव्यांना दणका देण्याच्या तयारीत
high-profile economic offenders news : कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेवून परदेशात गेलेल्या मोठ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे
नवी दिल्ली : high-profile economic offenders news : कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेवून परदेशात गेलेल्या मोठ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. भारतात परत या, त्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत कर्जबुडव्या उद्योजकांना (high-profile economic offenders) दणका देण्याची तयारी पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ते कर्ज प्रवाह आणि आर्थिक वाढीवर आयोजित एका चर्चेला संबोधित करत होते. त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात लपून बसलेल्या उद्योगपतींना इशारा दिला आहे. (Narendra Modis Message) देश सोडून पळालेल्या सर्व पळपुट्या कर्जबुडव्यांना परत आणण्यासाठी सरकार शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी कोणत्याही उद्योगपतीचे थेट नाव घेणे टाळले. कर्ज बुडवून परदेशात पळालेल्यांसमोर भारतात परतण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असंही मोदी म्हणाले.
हजारो कोटी रुपयांची कर्ज घेऊन परदेशात आश्रय घेतलेल्यांना आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीरबाबींचा अवलंब करत आहोत. लवकरच त्यात यशही येईल. त्यांना माझा एकच संदेश आहे की, भारतात परत या. कारण. तुम्हाला परत आणण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरुच राहणार आहेत. ते काही थांबणार नाहीत, असे मोदी म्हणाले.
विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना इशारा
पंतप्रधान मोदी यांनी कोणाच्या नावाचा थेट उल्लेख केला नाही. मात्र, त्यांचा रोख विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या पलायन केलेल्या उद्योगपतींकडे होता. आतापर्यंत चुकीचे काम केलेल्यांकडून 5 लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मोदी यांनी यावेळी दिली.
बँका अधिक सक्षम आणि दिला संदेश
केंद्रात 2014मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर बँका अधिक सक्षम झाल्याचा दावा मोदी यांनी यावेळी केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थाला नवी ऊर्जा देण्यासाठी बँका आता मजबूत स्थितीत काम करत आहेत. यामुळे भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी खूप मदत होणार आहे. बँकांनी आता स्वत:सोबतच देशाचं ताळेबंद खात्यांची स्थिती सुधारण्यासाठी सक्रियतेने काम करायला हवे, असे मोदी म्हणाले. तसेच बँकांनी आपले क्षेत्र विस्तार करण्यासाठी आता जुन्या संस्कृतीचा त्याग केला पाहिजे. कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीच्या दृष्टीकोनात सकारात्मक पद्धतीने विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले.
बँकांने आपल्या धोरणात बदल केला पाहिजे. ग्राहकांनी बँकेत येण्याची वाट पाहण्यापेक्षा आपण ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवे, बँकांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीसाठी आवश्यकतेनुसार ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवे, असे मोदी म्हणाले.