नवी दिल्ली - गेल्या साडेचार वर्षात कोणत्याच मुद्द्यावर एक सुरात न बोलणारे केवळ निवडणुकीपुरता एकत्र आले आहेत. पण देशाला लुटणाऱ्यांची ताकद एकत्र येत असल्याचे जनतेला माहिती आहे आणि येत्या निवडणुकीत देशातील जनताच निर्णायक असणार आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपविरोधातील महाआघाडीची मंगळवारी खिल्ली उडवली. 'एएनआय'ला दिलेल्या दीर्घ मुलाखतीत मोदी यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांना महाआघाडीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, काँग्रेस आणि इतर विरोधकांचे लक्ष्य एकमेव नरेंद्र मोदी आहेत. या आघाडीतील सर्व नेते केवळ मोदींवर टीका करतात. त्यांना बाकी काहीही दिसत नाही. देशातील कोणतेही वृत्तपत्र काढा विरोधी नेत्यांची केवळ मोदींविरोधातील वक्तव्ये दिसतील. फक्त आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे सर्व एकत्र आले आहेत. गेल्या साडेचार वर्षांत कोणत्याही मुद्द्यावर महाआघाडीतील नेते एकसुरात बोलले नाहीत. पण आता निवडणूक जवळ आल्याने सर्वजण एकत्र आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराचा निर्णय न्यायालयीन लढाईनंतरच- मोदी


आगामी निवडणूक मोदींशिवाय अन्य कोणीही विरुद्ध नरेंद्र मोदी अशी होईल का, असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, आगामी निवडणूक देशातील जनतेच्या इच्छा-आकांक्षाची आहे. देशातील जनतेच्या इच्छा आकांक्षासोबत कोणता पक्ष आहे आणि विरोधात कोणता आहे, हे केवळ जनताच सांगणार आहे. येत्या निवडणुकीत देशातील जनता निर्णायक असेल. गेल्या वेळी आमच्यासोबत जेवढे मित्रपक्ष होते. त्यापेक्षा जास्त आगामी निवडणुकीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


... आणि नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंचे नाव घेणे टाळले