मुंबई : लोकप्रियतेत प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल ३ लाखांनी घटली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत काँग्रेस नेते शशी थरुर. थरुर यांच्या फॉलोअर्स संख्येत १ लाख ५१ हजार ५०९ ने घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामानाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या  फॉलोअर्सची संख्या काही हजारात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधींपेक्षा मोदींच्या लोकप्रियेत सर्वाधिक घट दिसून येत आहे.  शुक्रवारी या दोन्ही नेत्यांच्या ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येत हजारोंनी घट झाली. मोदी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या २ लाख ८४ हजार ७४६ ने घटली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या १७ हजार ५०३ ने घटली आहे. सध्या त्यांच्या ट्विटरवरी फॉलोअर्सची संख्या ७.३३ मिलियन आहे. तर मोदींची ट्विटर फॉलोअर्सची संख्या सध्या ४३.१ मिलियन आहे, असे वृत्त  एएनआयने दिले आहे.



SocialBlade.com या संकेतस्थळानुसार, पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक ट्विटर हँडलने (@narendramodi) २, ८४, ७४६ फॉलोअर्स गमावले. तर त्यांच्या कार्यालयीन ट्विटर हँडलने (@PMOIndia) १,४०,६३५ फॉलोअर्स गमावले. तसेच राहुल गांधींच्या फॉलोअर्स संख्येत १७,५०३ ने तर काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या फॉलोअर्स संख्येत१ लाख ५१ हजार ५०९ ने घट झालेय.


दरम्यान, सोशल साईट ट्विटरने अनेक संशयास्पद आणि निष्क्रिय ट्विटर खाती बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या अचानक घटली आहे. 


यांचे किती फॉलोअर्स घटले - 


- पंतप्रधान नरेंद्र मोदी - २ लाख ८४ हजार ७४६
- काँग्रेस नेते शशी थरूर - १ लाख ५१ हजार ५०९
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज - ७४ हजार १३२
- वस्त्रोद्यग मंत्री स्मृती इराणी - ४१ हजार २८०
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी - १७ हजार ५०३
- तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन - १० हजार ९०२