नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकावर अल्पवयीन खेळाडूंना पॉर्न व्हिडिओ दाखवून लैंगिक जबरदस्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये बरेली येथील बारादरी पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार, दोन खेळाडूंनी प्रशिक्षकावर हा आरोप केला आहे. प्रशिक्षकाविरोधात तक्रार दाखल केलेल्या दोन्ही खेळाडू मुली असून, त्या अल्पवयीन आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रशिक्षकाने दोन्ही खेळाडूंना (वय वर्षे 14) पॉर्न व्हिडिओ दाखवले. तसेच, त्यांच्यावर लैंगिक जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला.


प्रशिक्षकाविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


अल्पवयीन कुमारी खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षकाविरूद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या खेळाडूंनी केलेल्या आरोपाती सत्यता तपासत आहेत.


बंद खोलीत बलात्काराचा प्रयत्न


दोन्ही पैकी एका तक्रारदार खेळाडूने सांगितले की, प्रशिक्ष त्यांना नैनिताल येथे पार पडलेल्या मान्सून मॅरेथॉन स्पर्धेसाठी घेऊन गेले. तेथे गेल्यावर एका बंद खोलीत त्यांनी आम्हाला मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पहायला दिले. त्यानंतर त्यांनी आमच्यावर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आम्ही विरोध केला तेव्हा, त्यांन आम्हाला धमकी दिली. तसेच, आम्ही विरोध केल्यावर ते बाहेर गेले पण, पुन्हा खोलीत येऊन त्यांनी तसाच प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही तेथून कसेबसे बाहेर पडलो. घरी आल्यावर आम्ही घटनेबाबत घरच्यांना माहिती दिली.


सहकारी खेळाडूंना सोडून बाईकवरून घेऊन गेले प्रशिक्षक


दरम्यान, तक्रारदार दुसऱ्या खेळाडूने सांगितले की, या प्रशिक्षकाने स्पर्धेसाठी जाताना इतर खेळाडूंना सोडून आम्हाला बाईकवरून मीरगंजला नेले. तेथे त्यांनी आमच्यासोबत छेडछाडीचा प्रयत्न केला, असा आरोपही दुसऱ्या तक्रारदार खेळाडूने केला आहे.