Good News | पहिल्यांदाच देशात महिलांची संख्या आली समोर, तर पुरुषांची....
देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात आतापर्यंत पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे.
मुंबई : देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात आतापर्यंत पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. शहर आणि गावच्या लोकसंख्येत मोठी तफावत दिसून आली आहे.
शातील महिलांबाबत खूप चांगली बातमी आली आहे. देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. आता प्रत्येक 1 हजार पुरुषांमागे 1 हजार 20 स्त्रिया आहेत. विशेष म्हणजे हा विक्रमही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाला आहे. ज्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1 हजारच्या वर गेली आहे. (National Family Health Survey for the 1st time in india there are more women than men)
आणखी एक चांगली बातमी म्हणजे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरातही सुधारणा झाली आहे. 2015-16 यादरम्यान 1 हजार मुलांमागे 919 इतक्या मुली होत्या, तीच आकडेवारी 2019-20 मध्ये 1 हजार मुलांमागे 929 मुली इतक्या होत्या.
गाव अजूनही शहराच्या पुढेच
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5) मधील डेटा गाव आणि शहरातील लिंग गुणोत्तराची तुलना करतो. सर्वेक्षणानुसार, शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये लिंग गुणोत्तर चांगले आहे. खेड्यांमध्ये दर 1 हजार पुरुषांमागे 1 हजार 37 महिला आहेत. तर शहरांमध्ये 985 महिला आहेत. याआधी NFHS-4 (2019-2020) मध्ये खेड्यांमध्ये 1 हजार पुरुषांमागे 1 हजार 9 महिला होत्या आणि शहरांमध्ये ही संख्या ९५६ इतकी होती.