`पोहा जिलेबी` हे `किंग्डम ऑफ दीक्षित`चं राष्ट्रीय अन्न
सुयश दीक्षित या भारतीय मुलाने काही दिवसांपूर्वी स्वतःला `किंग्डम ऑफ दीक्षित` घोषित केले होते.
मुंबई : सुयश दीक्षित या भारतीय मुलाने काही दिवसांपूर्वी स्वतःला 'किंग्डम ऑफ दीक्षित' घोषित केले होते.
इजिप्त आणि सुदान दरम्यान बीर ताविल भाग आहे. या भागावर कोणाचाही हक्क नाही असा दावा सुयशने केला होता.
बीर ताविल या भागावर सुयशने हक्क दाखवत या भागाला ' किंग्डम ऑफ दीक्षित' घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वी या भागाचा झेंडा त्याने फेसबुकच्या माध्यमातून समोर आणला होता. तसेच सुयशचे वडील या भागाचे पंतप्रधान असतील अशी माहिती त्याने दिली होती.
पोहा जिलेबी नाश्ता
झेंडा आणि इतर माहिती दिल्यानंतर आता सुयशने ' किंग्डम ऑफ दीक्षित' भागाचे राष्ट्रीय अन्न काय असेल हेदेखील सांगितले आहे.
सुयश मूळचा इंदौरचा आहे. इंदौरमध्ये पोहा जिलेबी खूप प्रसिद्ध आहे. आता हाच पदार्थ त्याने राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित केले आहे.
राष्ट्रीय प्राणी
' किंग्डम ऑफ दीक्षित' याअ प्रांतामध्ये राहणं फारच कठीण आहे. त्यामुळे तेथे माणूस नाही तर प्राणी कुठून येणार ? पण काही दिवसांपूर्वी जेव्हा सुयश या ठिकाणी गेला होता तेव्हा त्याला या जागी दोन पाली दिसल्या होत्या. त्यामुळे त्याने पालींना राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले आहे.