नवी दिल्ली : देशातील प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची शक्ती देशाच्या राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.


लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत विज्ञान भवन येथे 68व्या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. भारताची राज्यघटना जितकी जिवंत तितकीच संवेदनशील असल्याचं मोदी म्हणाले. शांती असो किंवा युद्ध देशातील एकजूट कायम राखण्याची ताकद राज्य घटनेत असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या मुद्यावर चर्चा व्हायला हवी असंही मोदींनी म्हटलं आहे.


मन की बात मधून 26/11तील शहिदांना आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून 26/11तील शहिदांना आदरांजली वाहिलीय... दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करायची असतील, तर मानवतावादी देशांना एकत्र येण्याची गरज असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान त्यांनी ‘मन की बात’मध्ये संविधान दिनाचाही उल्लेख केला...