नवी दिल्ली :  जगभरात Coronavirus कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. तिथे अमेरिकेमध्ये कोरोनाचं थैमान सुरु असतानाच भारतामध्येही परिस्थिती वेगळी नाही आहे. दर दिवशी देशातील विविध भागांमध्ये कोरोनारुग्ण आढळत असल्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा जवळपास दीड लाखांच्याही पार गेल्यामुळे आता ही बाब प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे अनेक आव्हानं उभी करत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून नुकतीच कोरोना रुग्णांच्या संख्येची नवी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही धक्कादायक आकडेवारी सध्या चिंतेचं कारण ठरत आहे. 


'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,५८,३३३ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्येमध्ये ४५३१ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये देशात  ६५६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं सिद्ध झालं आहे. तर, चोवीस तासांमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १९४ इतका आहे. 



 


देशात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ होत असली तरीही, या व्हायरसच्या संसर्गावर मात करणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. आताच्या घडीसा देशाच कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट गा ४२.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही एकच बाब या आव्हानाच्या प्रसंगी काहीसा दिलासा देत आगे. मुख्य म्हणजे योग्य ती काळजी, प्रतिबंधात्मक उपाय योजल्यास कोरोनापासून किमान दूर राहणं शक्य आहे. यातच सोशल डिस्टन्सिंगचं पालन केल्यास कोरोनावर वेगाने मात करणं शक्य होऊ शकतं हीच बाब सर्वांनी लक्ष।त घेणं अत्यावश्यक आहे.