अमृतसर : काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि पंजाब कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्याच राज्यात पक्षाचा प्रचार करणार नाही. कारण मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्यांनी प्रचार करु नका, असे स्पष्ट बजावले आहे. नवज्योत सिद्धू यांची पत्नी आणि भाजपच्या माजी आमदार नवजोत कौर यांनी ही माहिती आज दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धू यांची तब्बेत बिघडल्याचे वृत्त आले आहे. मात्र, त्यांची पत्नीने आरोप केला आहे की, पंजाबमध्ये प्रचार करण्याची परवानगी त्यांना पक्ष आणि पंजाबच्या प्रभारी आशा कुमारी देत नाहीत. त्यामुळे याला त्याच जबाबदार आहेत.


राहुल गांधी सर्वात मोठे कॅप्टन आहेत


नवज्योत कौर यांनी म्हटेल आहे की, कॅप्टन साहेब हे छोटे कॅप्टन आहेत आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे सर्वात मोठे कॅप्टन आहेत. त्यांनी सिद्धू यांना अन्य राज्यांची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.


नवजोत कौर म्हणाल्यात, जेव्हा कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी सर्व (१३) जागांची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये राजकीय प्रचारासाठी नवज्योत सिद्धू यांची काय गरज आहे? क्रिकेटरचे राजकीय नेते झालेले सिद्धू पटना साहिब येथे पक्षाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या समर्थनासाठी एका प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी ते बिहारला रवाना झाले आहेत.


दरम्यान, मी अमृतसरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, मला उमेदवारी देण्यात आली नाही. मला रोखण्यात आले. मला उमेदवारी न देण्यामागे अमरिंदर सिंग जबाबदार आहेत. तसेच चंदीगढ येथून भाजप उमेदवार किरण खेर यांच्या विरोधात लढण्यासाठीही माझी तयारी होती, अशी माहिती नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी कौर यांनी दिली.