नवी दिल्ली : पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी आपल्या राज्य मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याऐवजी माजी अध्यक्ष राहुल गांधींकडे हा राजीनामा सुपूर्द केला. तसेच सिद्धू यांनी ट्विटरवर यासंदर्भात घोषणा केली आहे. 10 जूनला राहुल गांधींना लिहीलेले पत्र त्यांनी ट्वीट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सिद्धू यांनी 10 जुलैलाच राजीनामा दिला होता पण आज त्यांनी आज यासंदर्भात खुलासा केला.



मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. अमरिंदर सिंह यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याचे खापर नवज्योत सिंह सिद्धू यांच्यावर फोडले होते. त्यानंतर दोघांमधला तणाव अधिकच वाढला.