नवी दिल्ली : सागरी मार्गातून संपूर्ण जगाला गवसणी घालणासाठी देशातील ६ महिला नेव्ही ऑफिसर्सने गुरूवारी प्रशांत महासागरात उठलेल्या तुफानाचा हिंमतीने सामना केला. फॉकलॅंड आयलॅंड्सजवळ येत असतानाच असा गंभीर प्रसंग उद्भवला. इंडियन नेव्हीने महिला ऑफिसर्सच्या साहसाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत महिला ऑफिसर्स मोठ्या हिंमतीने आणि बहादूरीने तुफानाचा सामना करताना दिसत आहेत. आणि त्याचबरोबर त्या आपली नौका INSV तारिणी सुरक्षित ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत.


५५ फूटांची नौका आणि ६ महिन्यांचा प्रवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या या नेव्ही महिला ऑफिसर्स ५५ फूटांच्या नौकेतून ६ महिन्यांसाठी समुद्रातून जगाला गवसणी घालणार आहेत. हा महिलांना समुद्रात शिप चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. समुद्री विश्वपरिक्रमेसाठी त्या १० सप्टेंबर २०१७ ला रवाना झाल्या. सर्वात महत्त्वाचे सर्व क्रू मेंबर्स महिला असणारी जगातील ही पहिली शिप आहे.


५ टप्प्यात पूर्ण होणार हा प्रवास


शिपचे नेतृत्व लेफ्टिनेंट कमांडर वर्तिका जोशी, नौसेनेचा एक आर्किटेक्ट आणि बाकी सर्व महिला नेव्ही अधिकारी लेफ्टिनेंट कमांडर करत आहेत. प्रतिभा जामवाल, लेफ्टिनेंट पी स्वाति, विजया देवी, पायल गुप्ता आणि बी ऐश्वर्य अशी यांची नावे आहेत. 



मोदींनी केलेला व्हिडिओ कॉल


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयएनएसव्ही तारिणी शिपवर असलेल्या लोकांशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. त्यांची चौकशी करून पूर्ण देशाकडून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.



सीतारमण यांनी दिला हिरवा झेंडा


नौकेला हिरवा झेंडा दाखवत रक्षामंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, या महिला अधिकारी आपल्या या अभियानात नक्कीच यश प्राप्त करतील. हे कार्य काही सोपे नसून यात त्यांच्या जिद्दीची, संकल्पाची आणि साहसाची प्रत्येक क्षणी परिक्षा होईल. पुढे त्या म्हणाल्या की, या महिला आपली प्रतिभा, कौशल्य आणि संकल्पाच्या आधारावर लढण्यास येत आहेत. मात्र जेव्हा कधी त्यांना मदतीची गरज असेल तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी आम्ही तयार असू.