दीपक भातुसे, मुंबई : बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 40 स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर केली आहे. बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्य स्टार प्रचारक राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार असणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूकीबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.


बिहार निवडणुकीसाठी आता मराहाराष्ट्रातील प्रमुख पक्ष देखील निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने निवडणूक अधिक रंगतादार होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये जेडीयू, भाजप विरुद्ध आरजेडी, काँग्रेस असा थेट सामना होणार असून एलजेपी ही स्वतंत्र लढत असल्याने त्याचा परिणाम काही जागांवर होऊ शकतो. दुसरीकडे शिवसेना देखील बिहारमध्ये आपले उमेदवार देणार असल्याने बिहार निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे.