नवी दिल्ली :  Lakhimpur Kheri Violence: लखीमपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेचा निषेध करत  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याचवेळी आपली बाजू मांडणाऱ्या शेतकऱ्यावर दडपशाही करण्यात आली आहे. लखीमपूरची घटना हा शेतकऱ्यांवर झालेला हल्लाच (Attack on Farmers) आहे, शरद पवार म्हणाले. (NCP's attack on BJP; This attack on farmers, investigate this incident - Sharad Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखीमपूरवरून केंद्र, भाजपवर कडाडून टीका राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेने केली आहे. ही घटना आणीबाणीपेक्षा भयानक असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. दरम्यान, या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केली. 


शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. लखीमपूर घटनेची संपूर्ण जबाबदारी उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारची आहे. लखीमपूरची घटना हा शेतकऱ्यांवर झालेला हल्लाच आहे, असा आरोप पवार यांनी केला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेवर पवार यांनी पत्रकार परिषद घेत  भाष्य केले आहे. केंद्र सरकारची नियत स्पष्ट होत आहे. आपल्याकडे सत्ता आहे म्हणून शेतकऱ्यांना चिरडू शकत नाही. देशभरातील शेतकरी यांचे उत्तर देतील, असे पवार यावेळी म्हणाले.


आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करु.  विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटू न देणे, त्यांना डांबून ठेवणे ही लोकशाहीची हत्याच, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी केली. आज सत्ता आहे म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहात. हे एक दोन दिवस चालेल, पण नंतर तुम्हाला याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा त्यांनी भाजपला दिला.