नवी दिल्ली: दाऊदी बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन यांनी मोदींवर टीका केली आहे. मात्र, ही टिप्पणी करताना मेमन यांनी मोदींबद्दल काही आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांनी कट्टर हिंदुत्वापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर हिंदू संघटना लगेच आक्रमक होतात. नुकतीच त्यांनी बोहरा समाजाची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या माध्यमातून त्यांनी मुस्लीम समाजाला चुचकारायचा प्रयत्न केला. पण शेवटी ते ना इकडचे राहतील ना तिकडचे. 'धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का' सारखी त्यांची अवस्था असेल, असे मेमन यांनी म्हटले. 


आता हे पंतप्रधानांवरच अवलंबून असेल की कोणत्या बाजूला झुकतील. असे नको व्हायला की ते इकडचेही नसतील आणि तिकडचेही नसतील. परंतु, दुर्दैवाने तसे होताना दिसत असल्याचे मेमन यांनी सांगितले.