Narendra Modi Cabinet Ministers Portfolio: लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर रविवारी एनडीएचा शपथविधी सोहळा (NDA Oath Ceremony) पार पडला. राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) येथे पार पडलेल्या शपविधीदरम्यान पंतप्रधानांसह एकूण 72 मंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान शपथविधी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खातेवाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक खातं देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकार 3.0 च्या शपथविधीनंतर खात्यांची विभागणी करण्यात आली आहे. मोदी 3.0 सरकारच्या मंत्रिमंडळात 25 भाजपाचे आणि 5 मंत्रीपदे मित्रपक्षांचे आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कोणता विभाग कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला आला आहे ते जाणून घ्या.


कॅबिनेट मंत्री



1)  राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
2) अमित शहा  - गृहराज्यमंत्री आणि सहकार मंत्री
3) नितीन गडकरी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री.
4) जे पी नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायने आणि खते मंत्री
5) शिवराज सिंह चौहान  - कृषी व शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री ना.
6) निर्मला सीतारामन - अर्थमंत्री; आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री.
7) सुब्रह्मण्यम जयशंकर - परराष्ट्र व्यवहार मंत्री.
8) मनोहर लाल - गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
9) एच डी कुमारस्वामी - अवजड उद्योग मंत्री; आणि पोलाद मंत्री.
10) पियुष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्री.
11) धर्मेंद्र प्रधान  - शिक्षणमंत्री.
12) जितनराम मांझी - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री.
13) राजीव रंजन सिंग उर्फ ​​ललन सिंग - पंचायत राज मंत्री; आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री.
14) सर्बानंद सोनोवाल - बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री.
15) वीरेंद्र कुमार  - सामाजिक न्याय 
16) किंजरापू राममोहन नायडू - नागरी विमान वाहतूक मंत्री.
17) प्रल्हाद जोशी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री; आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री.
18) जुआल ओरम - आदिवासी व्यवहार मंत्री


19) गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्री
20) अश्विनी वैष्णव - रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री; आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री.
21) ज्योतिरादित्य एम. सिंधिया - दळणवळण मंत्री; आणि ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री.
22) भूपेंद्र यादव - पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री.
23) गजेंद्रसिंह शेखावत - सांस्कृतिक मंत्री; आणि पर्यटन मंत्री.
24) अन्नपूर्णा देवी - महिला व बालविकास मंत्री
25) किरेन रिजिजू -  संसदीय कामकाज मंत्री; आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री.
26)  हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
27) मनसुख मांडविया  - कामगार आणि रोजगार मंत्री; आणि युवा कार्य आणि क्रीडा मंत्री.
28) किशन रेड्डी - कोळसा मंत्री; आणि खाण मंत्री.
29)  चिराग पासवान - अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री.
30) सी आर पाटील - जलशक्ती मंत्री.


महाराष्ट्राच्या वाट्याला काय?


नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय (Union Ministry of Road Transport) सोपवण्यात आलं आहे. तर पियुष गोयल यांच्याकडे उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. . मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाकडून त्यांनी यंदा विजय मिळवला.


पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. तर रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा आणि युवा विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. बुलडाणाचे खासदार प्रतापराव जाधव आयुष मंत्रालय देण्यात आलं आहे. तर रामदास आठवलेयांच्याकडे सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे.