NEET परीक्षेत विद्यार्थिनींना बसला मोठा धक्का, `त्या` घटनेने झालं मानसिक खच्चीकरण
NEET परीक्षेत विद्यार्थिनींना काढायला लावली अंतर्वस्त्र, नेमका वाद काय जाणून घ्या
केरळ : देशभरात रविवारी 17 जुलै रोजी 'नीट' परीक्षा पार पडली. या परीक्षेदरम्यान केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा द्यायला गेलेल्या तरूणींना अंतर्वस्त्र काढायला लावल्याची घटना घडली. या घटनेने अनेक तरूणींचे मानसिक खच्चीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी पोलिस ठाण्य़ात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
'नीट'च्या (NEET) परीक्षेदरम्यान केरळमधील कोल्लममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे असलेल्या परीक्षा केंद्रावर काटेकोरपणाच्या नावाखाली विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्रही काढून घेतल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी संतापलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पालकांचे आरोप काय?
तक्रारदार मुलीच्या वडिलांनी सांगितले की, 'माझ्या मुलीला सांगण्यात आले की मेटल डिटेक्टरमध्ये अंडरगारमेंटचा हुक सापडत आहे. त्यामुळे तिला ते काढावे लागले. जवळपास ९० टक्के विद्यार्थिनींबाबत हाच प्रकार घडलाय. त्यामुळे या विद्यार्थिनी परीक्षेच्या काळात खूप मानसिक त्रासात होत्या.
दुसर्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, 'माझ्या मुलीला सांगण्यात आले की तू परीक्षेत ड्रेस कोड पाळला नाहीस आणि तिला
अंतर्वस्त्र काढावे लागतील. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्ही परीक्षेला बसू शकणार नाही.
मुस्लिम विद्यार्थिनींनाही रोखलं
हिजाब परिधान केलेल्या चार मुस्लिम मुली राजस्थानमधील कोटा येथील मोदी कॉलेज सेंटरमध्ये पोहोचल्या होत्य़ा. त्यांना पोलिसांनी गेटवर अडवले. मुलींनी हिजाब काढण्यास नकार दिला. पोलिसांना समजावून सांगताना त्याने ड्रेस कोडचा हवाला दिला.
या प्रकरणावर एएसआय गीता देवी यांनी सांगितले की, पोलिसांनी गेटबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. काही विद्यार्थ्यांनी पूर्ण कपडे घातले होते, त्यांना कडक तपासणीनंतर आत प्रवेश देण्यात आला. ज्या मुलींनी हिजाब घातले होते, त्यांना प्नवेश दिला नव्हता, असे त्या म्हणाल्या आहेत.