मुंबई : 2021 मध्ये नीट परीक्षा ( NEET exam ) एकदाच घेतली जाणार आहे. देशाचे शिक्षणंत्री रमेश पोखरियाल यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा यंदा दोनदा घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सोमवारी लोकसभेत बोलताना शिक्षणंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं की, २०२१ मध्ये नीटची परीक्षा एकदाच घेतली जाईल. याबाबत आम्ही आरोग्य मंत्रालय आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशीही चर्चा केली आहे.


परीक्षा केंद्रांवर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील, तसंच कोविडचा प्रादुर्भाव पाहता आरोग्याशी निगडीतही सर्व काळजी घेतली जाईल, असंही पोखरियाल यांनी आश्वस्त केलं आहे.


देशभरातील विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएकडे मागणी केली होती की, नीट परीक्षा दोनदा घेण्यात यावी. मेडिकलमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. जेईई मेन परीक्षा चार वेळा घेण्यात येणार आहे, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नीटचीही परीक्षा दोनदा व्हावी, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं.


नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केल्याप्रमाणे या वर्षी १ ऑगस्टला नीट परीक्षा घेतली जाणार आहे. आणि त्यानुसारच मेडिकलचे पुढचे प्रवेश घेतले जातील.


यंदा नीट परीक्षा हिंदी, इंग्रजीसह ११ भाषांमध्ये घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला, तरीही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे. ज्यांना या वर्षी नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांना ntaneet.nic.in वर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.